Department of Marathi
General Information
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित चिकित्सक समूहाच्या पाटकर-वर्दे महाविद्यालयातील मराठी विभागाला समृद्ध आणि गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभली आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून, १९६४ पासून, कार्यरत असलेला हा विभाग मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. निबंधलेखन, स्वरचित काव्यलेखन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, साहित्यिक व्याख्याने आणि व्यावसायिक मार्गदर्शनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. नामवंत साहित्यिक, लेखक, पटकथालेखक आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याच्या संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.
अभ्यासक्रम अधिक रंजक आणि परिणामकारक करण्यासाठी संबंधित चित्रपट, नाटके, ई-नोट्स आणि ऑनलाइन सराव चाचण्यांचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयातील समृद्ध मराठी साहित्यसंपदेचा लाभ मिळतो. विभाग शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही प्राधान्य देतो. मराठी भाषा, लोकसाहित्य, मध्ययुगीन व आधुनिक साहित्य आणि भाषाविषयक अभ्यासाची गोडी निर्माण करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करणे, हे विभागाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अनुभवी व अभ्यासू प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्ण संवाद आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन ही विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि ज्ञानपरंपरेचा महत्त्वपूर्ण आधार आहे. या जाणिवेतून मराठी विभाग विद्यार्थ्यांना भाषेचा अभिमान, साहित्याची अभिरुची आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव करून देतो. बदलत्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञानात्मक परिस्थितीशी सुसंगत राहून मराठी भाषेचा प्रसार, साहित्याची आवड आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेने विभागाची वाटचाल निरंतर सुरू आहे.
Faculty Members
Dr. Prakash Namdevrao Hivrale
Assistant Professor / B.A.,M.A.,M.ED, M.Phil, Set, Ph.D, ( Marathi ) & MSW, DCJ & Pol. Sci.
Teaching Experience
2 Year (Total 14 Years)
Area of Specialization
Aesthetics & Indian Literature
Achievements
Faculty achievements:
- Two minor projects completed.




